कृषि सल्ला : हरभरा Gram Crop
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३० ते ४५ दिवसांत
शेत हे तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. पिकातील
तण व्यवस्थापनामुळे एकूण पिकाच्या उत्पादनात जवळपास २० टक्के वाढ पाहायला मिळते.
व्हॉट्सॲप ग्रुप
ला जॉइन व्हा
पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी करावी आणि पीक हे
३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमिनीतील
बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकविण्यास मदत होते तसेच दोन ओळींतील तण
काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेचच
खुरपणी करावी. यासाठी गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच कराव्यात.
मजुरांअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास, हरभरा पेरणीपूर्वी च जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंडिमिथॅलिन (३० ईसी) या
तणनाशकाची १ ते १.२ लिटर प्रति एकरी २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
व्हॉट्सॲप ग्रुप
ला जॉइन व्हा