प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ – महत्वाची बातमी | Pik vima yojana kharip 2021 parbhani news

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ – महत्वाची बातमी | Pik vima yojana kharip 2021 parbhani news

 परभणी :  शेतकऱ्यांना तक्रार देण्याची आवश्यकता नाही - जिल्हाधिकारी आंचल गोयल


परभणी, दि.20:

परभणी जिल्ह्यामध्ये चालू २०२१-२०२२ खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीत रिलायन्स जनरल इंसुरन्स कंपनीने पीक विमा मंजूर केला आहे. ऑनलाइन मध्ये पूर्व सूचना दिलेल्या शेतकर्‍यांपैकी ३ लाख ५१ हजार १६० शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले आहेत तर पूर्वसूचना न दिलेल्या शेतकर्‍यांनाही पीक विम्याचा (pik vima) लाभ हा एप्रिल – मे महिन्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


खरीप हंगाम 2021-22 अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये एकुण 6 लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. त्यापैकी सोयाबीन पिकाचे एकुण 3 लाख 1 हजार 676, कापुस पिकाचे 43 हजार 828,  तुर पिकाचे 1 लाख 8 हजार 571, मुग पिकाचे 1 लाख 12 हजार 223, उडीद पिकाचे 40 हजार 882, खरीप ज्वारी पिकाचे 24 हजार 285 व बाजरी पिकाचे 3 हजार 66 असे एकुण 6 लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी  पिक विमा भरलेला आहे.


ज्या शेतकऱ्यांनी ज्या पिकासाठी तक्रार दिली होती त्यांना त्याच पिकाच्या पिक वाढीची अवस्था, नुकसानीची टक्केवारी व पुर्वसुचना ज्या महिन्यामध्ये दिली त्या कालावधीनुसार पिक विमा वाटप करण्यात आला आहे.  ज्या शेतकर्‍यांनी पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत नुकसानीची पुर्वसुचना दिली नव्हती त्या शेतकर्यांवना पिक कापणी प्रयोग आधारीत महसुल मंडळ निहाय पिक विमा लागु झाल्यास राज्य व केंद्र सरकारचा दुसरा हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक विमा वाटप करण्यात येईल. त्यांना आता तक्रार देण्याची आवश्यकता नाही तरी त्यांनी तक्रार देण्यासाठी कार्यालयात गर्दी करु नये. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले.


शासन निर्णय क्र. प्रपीवियो-2020/प्र.क्र.40/11-ऐ दि.29 जुन 2020 नुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021-22 परभणी जिल्ह्यामध्ये  रिलायन्स जनरल इन्शुरस कंपनीमार्फत राबविण्यास मान्यता मिळाली.  माहे जुलै व सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी शासन निर्णय मुद्दा क्र.10.4 नुसार वैयक्तिकस्तरावर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची एकुण 3 लाख 78 हजार 307 शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीस विविध मार्गानी नुकसानीच्या पुर्वसुचना दिल्या. त्यापैकी 3 लाख 51 हजार 160 शेतकऱ्यांच्या पुर्वसुचना पिक विमा कंपनीने पात्र ठरविल्या व उर्वरीत 27 हजार 147 शेतकऱ्यांच्या पुर्वसुचना परत परत (Duplicate) असल्यामुळे पिक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या आहेत.  पात्र ठरलेल्या 3 लाख 51 हजार 160 शेतकऱ्यांसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 272.24 कोटी विमा मंजुर करण्यात आला. त्यापैकी दि.20 डिसेंबर 2021 पर्यंत 3 लाख 44 हजार 944 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 269.98 कोटी पिक विमा जमा करण्यात आला आहे. उर्वरीत पात्र 6 हजार 216 शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा वाटप करण्याची प्रक्रिया चालु असुनलवकरात लवकर जमा होणार आहे.


तसेच शा.नि.प्रपिवियो2020/प्र.क्र.40/11-अ‍ दि. 29-06-2020 मधील मुद्दा क्र. 10.2 नुसार अधिसुचित केलेल्या पिक विमा क्षेत्रातील तुर या अधिसुचित पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई ठरवण्यासाठी तुर पिकाचे एकुण संरक्षित क्षेत्राच्या 5 टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करुन शासन निर्णयातील मुद्दा क्र. 10.2 नुसार जे महसुल मंडळ पात्र होतील त्या अधिसुचित महसुल मंडळासाठी दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी काढलेली अधिसुचना  लागु राहील. यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर कोणत्याही कार्यालयात ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार देण्याची गरज नाही. असे आवाहनही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.