मौजे खंडाळी तालुका गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न Smart Cotton Farmers Training Programme at Khandali Village, Gangakhed

मौजे खंडाळी तालुका गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

        परभणी: दि 24 ऑगस्ट 2022, वार बुधवार रोजी गंगाखेड तालुक्यातील खंडाळी या गावामध्ये स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन हे श्री बनसावडे पी बी, तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

        कार्यक्रमासाठी गावातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते यावेळी श्री बोबडे आर डी, मंडळ कृषि अधिकारी, राणीसावरगाव ह्यांनी उपस्थित शेतकर्‍यांना कापूस पिकाचे खत व्यवस्थापन, गुलाबी बोंड अळी नियंत्रण साठी कामगंध सापळे यांचा वापर या विषयांवरती मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमास श्री शिसोदे, कृषि पर्यवेक्षक, श्री राऊत आर ए, कृषि सहाय्यक, श्री सोनटक्के, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आणि गावातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

कृषि विभाग, गंगाखेड

मौजे खंडाळी तालुका गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न Smart Cotton Farmers Training Programme at Khandali Village, Gangakhed

मौजे खंडाळी तालुका गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न Smart Cotton Farmers Training Programme at Khandali Village, Gangakhed

मौजे खंडाळी तालुका गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न Smart Cotton Farmers Training Programme at Khandali Village, Gangakhed

Blogger द्वारे प्रायोजित.