आपल्याला पूर्वसंमती मिळाली का? महाडीबीटी पोर्टल वरील पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी पहा | Pre sanction list of mahadbt portal mechanization as on 10 september 2022

 



महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर ०७ दिवसांमध्ये संबंधित शेतकर्‍यांना महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक  कागदपत्रेअपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच यानंतरही ज्या शेतकर्‍यांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांना नोंदनिकृत मोबाइल संदेश पाठवून परत  ०३ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येईल. आणि या मुदतीमध्ये जे शेतकरी अर्ज सादर करणार नाहीत त्यांचे अर्ज सिस्टीम आपोआप रद्द करेल. म्हणजेच निवड झाल्यापासून १० दिवसांमध्ये संबंधित शेतकर्‍यांना महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक  कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल.

त्याचप्रमाणे पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर बिल सादर करण्याकरिता २५ दिवसांची मुदत दिली जाते आणि या मुदतीमध्ये बिल सादर न केल्यास नोंदनिकृत मोबाइल संदेश पाठवून परत  ०५ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येते आणि या मुदतीमध्ये ही बिल सादर न केल्यास सिस्टीम अर्ज आपोआप रद्द करेल. म्हणजेच ३० दिवसांमध्ये निवड झालेली बाब/घटक खरेदी करून बिल अपलोड करणे बंधनकारक असते.


तर, जे शेतकरी बांधव निवड होऊन पूर्व संमती च्या प्रतीक्षेत असतील ते खालील यादी मध्ये आपले नाव पाहू शकता. अधिक माहिती साठी आपल्या तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.

महत्वाची सूचना

 ज्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती मिळाली आहे त्यांनी पूर्वसंमती मिळाल्यापासून 30 दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टल वर बिल अपलोड करावीत अन्यथा पूर्वसंमती रद्द होऊ शकतो.


महाडीबीटी पोर्टल कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी दि: 10/09/2022 स्थितीस अनुसरून




महाडीबीटी अपडेट मिळवण्यासाटी खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा

परभणी महाडीबीटी योजना ग्रुप : जॉइन व्हा

फक्त परभणी जिल्ह्यातील रहिवाशी यांनी वरील ग्रुप मध्ये जॉइन व्हावे

इतर जिल्हे साठी या ग्रुप ला जॉइन व्हा


Blogger द्वारे प्रायोजित.