पीक नुकसान क्लेम दाखल केला का? Crop Insurance Scheme Claim | Online Insurance Claim

 

पीक नुकसान क्लेम दाखल केला का? Crop Insurance Scheme Claim | Online Insurance Claim
पीक नुकसान क्लेम दाखल केला का? Crop Insurance Scheme Claim | Online Insurance Claim

नमस्कार शेतकरी बांधवानो, सध्या पीकविमा (Crop Insurance) तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी विमा (Insurance company) कंपणी कार्यालयात जात आहेत जी की विमा (Insurance) कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसताना. कारण, झेरॉक्स सेंटर शेतकऱ्यांना गरज नसताना अनावश्यक कागदपत्रे घ्यायला लावतात आणि फाईलचा संच तयार करून शेतकऱ्यांना दाखल करण्यास सांगत आहेत त्यामुळे शेतकरी अनावश्यक खर्च करून आर्थिक संकटास सामोरे जात आहेत. तर मग यावर काय उपाययोजना करता येतील ते आपण पाहुयात....

 

प्रधानमंत्री पिक विमा योजने (Pradhan Mantri Fasal Bima Yojana)(Prime Minister Crop Insurance Scheme) अंतर्गत खरीप हंगाम (Kharif Season) 2022 मधील विमाधारक (Insured) शेतकरी यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे/अतिवृष्टी (Excess Rainfall) मुळे पिकाचे नुकसान झाल्यास कंपनीला 72 तासाच्या आत मध्ये कळवायचे असते, त्याकरिता

 

Crop Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप) चा वापर करावा, इतर बाबीद्वारे उदा. ई-मेल, फोनद्वारे, पत्रव्यवहार करून सूचना देण्या ऐवजी या क्राॅप इन्शुरन्स ॲपद्वारे सुचना देणे सोईचे आहे, नुकसान सूचना दिल्या नंतर आपल्याला पावती स्वरूपात डॉकेड नंबर मिळतो, SMS सुद्धा मिळतो, *तरी ॲप डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकचा वापर करावा 

Crop Insurance Application

https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

 

🎯 याशिवाय तक्रार करण्यासाठी ICICI लोंबार्ड विमा कंपनी (ICICI Insurance Company) ने दिलेला टोल फ्री क्रमांक्र  18002669725 सुद्धा आहे.

या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्यातील कंपनी चा टोल फ्री क्रमांक वापरावा जो की आपल्या विमा पावती (Crop Insurance Receipt) वरील खालच्या बाजूस दिलेला असतो.

 

🎯 ज्या शेतकऱ्यांना ॲप्स चा वापर करून पीक नुकसानीची पूर्वसूचना (Crop Loss Intimation) देणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी ICICI लोंबार्ड विमा कंपनी च्या ई-मेल customersupport@icicilombard.com वर पीक नुकसानीचा तपशील नुकसानीचा फोटो व विमा पावती अपलोड करूही  तक्रारीची नोंद करता येते.

 

या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्यातील कंपनी चा इ मेल वापरावा जो की आपल्या विमा पावती (Crop Insurance Receipt) वरील खालच्या बाजूस दिलेला असतो.

 

 

सद्य परिस्थिति मध्ये तक्रार करत असताना काढणी पश्चात (Post Harvest) मध्येच तक्रार नोंदवावी कारण पीक वाढीची अवस्था संपून पीक काढणी ची स्टेज सध्या सुरू आहे आणि ह्या प्रकार मध्ये दाखल केलेल्या च तक्रारी स्वीकारल्या जातात.

 

महाडीबीटी पूर्वसंमती यादी पहिली का? ....नाही तर मग...येथे  पहा

 

Prime Minister Crop Insurance Scheme, Crop Insurance Scheme, Insurance for life, Insurance for, insurance claim, ICICI Lombard Insurance, Reliance General Insurance, Agricultural Insurance Company, Insurance Company, 

Blogger द्वारे प्रायोजित.