Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed

 

Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed

आज दि 01/11/2022, वार मंगळवार, रोजी गंगाखेड (Gangakhed, Parbhani) तालुक्यातील मौजे पिंपरी येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project) अंतर्गत द्वितीय शेतकरी प्रशिक्षण (2nd Training)  वर्गाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ. जी डी गडदे सर, कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान माहिती तंत्रज्ञान केंद्र, व ना म कृ वी, परभणी यांनी गावातील कपाशी वरील दहिया रोग प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. श्री डी डी पटाईत सर ,कीटक शास्त्रज्ञ, व ना म कृ वी, परभणी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी माहिती दिली तसेच रब्बी हंगाम मधील हरभरा बीज प्रक्रिया, जैविक बुरशिनाशक यांचे महत्व पटवून दिले आणि तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्न आणि शंका समाधान केले.

 

Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed


प्रशिक्षण वर्गामध्ये कु. पौळ एस जी, मंडळ कृषी अधिकारी, गंगाखेड यांनी उपस्थीत शेतकरी यांना स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project) अंतर्गत गट प्रवर्तक यांची नोंदणी, प्रकल्पातील पुढील कार्यपद्धती आणि प्रकल्प अंतर्गत स्वछ कापूस वेचणी करून त्या कापसाची साठवणूक विषयी मार्गदर्शन केले.

 

 

प्रशिक्षण वर्गास (Smart Cotton Project) कृषि सहाय्यक श्री मतलाकुटे व्ही टी, आत्मा चे श्री सोनटक्के सर, तसेच गावातील सर्व कापुस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अधिक वाचा :

* कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी 29 ऑक्टोबर 2022

* कृषि विभाग कडून ट्रॅक्टर ट्रॉली साठी 75,000/- अनुदान

* हरभरा सुधारित वाण

* महाडीबीटी ऑनलाइन बियाणे सोडत रब्बी हंगाम

* कृषि यंत्र लॉटरी यादी 17 ऑक्टोबर 2022

* ठिबक तुषार लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

* कृषि यंत्र औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

* पीक नुकसान क्लेम दाखल केला का?

* कुसुम सौर कृषि पंप अर्ज नोंदणी सुरू...

Blogger द्वारे प्रायोजित.