तुरीचा नवीन सुधारित वाण BDN 2013-41 (गोदावरी) | बीडीएन-२०१३-४१ गोदावरी तूर , कृषी संशोधन केंद्र, बदनापूर

 

तुरीचा नवीन सुधारित वाण BDN 2013-41 (गोदावरी) | बीडीएन-२०१३-४१ गोदावरी तूर , कृषी संशोधन केंद्र, बदनापूर

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर यांनी विकसित केलेले तुरीचा नवीन सुधारित वाण BDN 2013-41 (गोदावरी) हे सध्या मराठवड्यातील बरेच शेतकरी वापरत आहेत.  तुरीचे हे वाण BDN 2013-41 (गोदावरी) जे की हेक्टरी 24 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता राखते.

 

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर हे कडधान्य पिकं संशोधन मध्ये अग्रेसर संशोधन केंद्र आहे. मागील काही वर्षात या ठिकाणी तूर BDN 2013-41,मूग,उडीद,हरबरा पिकांच्या भरपूर सुधारित जाती विकसित केल्या आहेत आणि चांगल्याच प्रचलित देखील आहेत.

 

तूर वाण BDN 2013-41 (गोदावरी) जातीची वैशिष्ट्ये :


v हे वाण सिंचनाची सोय असलेल्या भागासाठी शिफारस करण्यात येते.

v कालावधी हा १६०-१६५ दिवसांचा आहे.

v हे वाण मर, वांझ रोगास प्रतिकारक आहे.

v बीडीएन 2013-41 गोदावरी वाणाची फुले पिवळसर पांढरी आणि दाण्याचा रंग पांढरा आहे.

v तूर BDN 2013-41 हेक्टरी 19-24 क्विंटल उत्पादन.

v कोरडवाहू क्षेत्रात पेरणी साठी भारी जमिनीमध्येच लागवड करावी.

v BDN 2013-41 वाण घेण्यासाठी एका पाण्याची हमखास सोय असेल, तर लागवड करावी.

 

परभणी तालुक्यातील खाणापुर येथील शेतकरी यांनी घेतलेले तुरीचे BDN 2013-41 (गोदावरी) वाण आणि टिपलेले छायाचित्र :



व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा



अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड अर्ज करण्यास सुरुवात झाली...

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 25/11/2022

Blogger द्वारे प्रायोजित.