पोकरा योजनेअंतर्गत अनुदान आता लवकर खात्यात जमा होणार | 600 कोटी रूपयांचा निधि मंजूर, शासन निर्णय Pocra subsidy disbursement gr shasan nirnay

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


पोकरा योजनेअंतर्गत अनुदान आता लवकर खात्यात जमा होणार | 600 कोटी रूपयांचा निधि मंजूर, शासन निर्णय 


काही दिवसांपासून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा Pocra) योजनेचा निधि उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र, या योनेसाठी निधि वितरित करण्यात येणार असून ज्यांचे अनुदान राहिले होते त्यांच्या खात्यात लवकरच अनुदान वितरित होणार आहे.


राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा Pocra) योजनेसाठी 2021-2022 साठी शासनाने 600 कोटी रुपये मंजूर केले असून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 


राज्यातील 5142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा pocra) ही योजना राबविली जात असून या प्रकल्प अंतर्गत विविध योजना राबविल्या जात असतात. यामध्ये कृषि यांत्रिकीकरण , ठिबक, तुषार, शेततळे, फळबाग लागवड, मत्स्य पालन, विहीर पुनर्भरण, बिजोत्पादन, इ., योजनाचा लाभ दिला जातो.



परंतु, काही दिवसांपासून निधि उपलब्ध नसल्यामुळे शेतकर्‍यांना अनुदान प्राप्त होत नव्हते पण आता या योजनेसाठी 2021-2022 साठी शासनाने 600 कोटी रुपये मंजूर केले असून याबाबत दि 27/01/2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आणि आता लवकरच प्रलंबित अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.



सन 2021-22 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.600 कोटी निधी वितरित करणेबाबत.






Leave a Comment