नमस्कार शेतकरी बांधवानो,
महा डीबीटी पोर्टल द्वारे कृषि विभागातील विविध योजना जसे की, कृषि यांत्रिकीकरण, सिंचन साधने आणि सुविधा, फलोत्पादन या मुख्य घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते.
तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.
तर शेतकरी बांधवानो, महाडीबीटी पोर्टल द्वारे दि. 28/01/2022 रोजी झालेल्या ऑनलाइन लॉटरी यादी मध्ये खलील तालुक्यातील शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे त्या शेतकरी बांधवांनी निवड झाल्यापासून 10 दिवसांत आवश्यक कागदपत्रे ही महा डीबीटी पोर्टल वर अपलोड करणे बंधनकारक आहे, अन्यथा आपली निवड रद्द करून प्रतीक्षा यादीमधील शेतकरी बांधवांना प्राधान्य दिले जाईल.
आपण आपल्या तालुक्यातील दि 28/01/2022 रोजी झालेली निवड यादी खलील दिलेल्या तालुक्या वरती क्लिक करून पाहू शकता.
जर आपणास काही शंका असतील तर आपण तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क करू शकता.
महा डीबीटी ऑनलाइन लॉटरी यादी दि. 28/01/2022
जिल्हा परभणी
निवड यादी पाहण्यासाठी आपल्या तालुकावरती क्लिक करावे:
टिप: निवड झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे माडीबीटी पोर्टल वर अपलोड करणे आवश्यक आहे अन्यथा आपली निवड रद्द होऊ शकते.
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आपल्या जवळील सीएससी सेंटर ला भेट द्या.