महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer
महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer

 

महाडीबीटी – शेतकरी योजना
महत्वाची अपडेट
एक शेतकरी एक अर्ज


“महाडीबीटी – शेतकरी योजना” बद्दल :

शेतकरी बांधवानो, आपणास कृषि
विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी
कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत होतो. आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला
एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच
, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा
अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि
त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उतारा
, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात
जमा करावी लागत होती.

परंतु, शेतकरी बांधवानो आता  कृषि विभाग, महाराष्ट्र शासन
यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना
कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये
, किंवा कोणतेही कागदपत्रे
जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी
वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे
आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल
,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी
योजना
हे पोर्टल तयार केले आहे.

आता ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागातील विविध
योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्र किंवा जवळील
कम्प्युटर सेंटर ला भेट देऊन महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल/साइट वरती हव्या असलेल्या
बाबी/घटक साठी अर्ज करू शकतात.


“महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल
प्रकिया:

महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल वर अर्ज
केल्यानंतर कृषि विभाग सोडत जाहीर करते म्हणजेच लॉटरी यादी प्रसिद्ध करते तसेच ज्या
शेतकरी बांधवांची लॉटरी मध्ये निवड झाली आहे त्यांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती
निवड झाल्याचा संदेश देखील पाठविला जातो. निवड झाल्यानंतर शेतकर्‍यांना निवड बाब/घटक
साठी आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी – शेतकरी योजना ह्या पोर्टल वरती उपलोड करावी लागतात.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्रांची कृषि विभाग छाननी करते आणि कागदपत्रे
योग्य असल्यास त्या लाभर्थ्यास निवड झालेला घटक/बाब खरेदी करण्यासाठी पुर्वसंमती देण्यात
येते.

पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभर्थ्याला
तो निवड झालेला घटक खरेदी करून अनुदान मागणी करिता त्याचे बिल/इनवॉइस हे महाडीबीटी
– शेतकरी योजना या पोर्टल वर अपलोड करावे लागते. त्यानंतर परत अपलोड केलेल्या बिल आणि
निवड झालेल्या बाब/घटक नुसार लाभर्थ्याने खरेदी केलेल्या बाब/घटक ची कृषि विभाग जयमोक्यावर
जाऊन पाहणी करते म्हणजेच मोका तपासणी केली जाते आणि त्यानंतर लाभर्थ्यास अनुदान अदा
केले जाते.

तर अशा प्रकारे महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल
वरती प्रक्रिया पार पाडली जाते.


महाडीबीटी – शेतकरी योजना योजना पोर्टल बद्दल
महत्वाची अपडेट:

शेतकरी बांधवानो आता महाडीबीटी – शेतकरी योजना
पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर निवड झाल्याचा संदेश त्या अर्जदाराच्या नोंदनिकृत मोबाइल
वर दिला जाणार आहे. निवड झाल्यापासून ०७ दिवसांमध्ये संबंधित शेतकर्‍यांना महाडीबीटी
पोर्टल वर आवश्यक  कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक
असेल.
तसेच यानंतरही ज्या शेतकर्‍यांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांना
नोंदनिकृत मोबाइल संदेश पाठवून परत  ०३ दिवसांची
वाढीव मुदत देण्यात येईल
.
आणि या मुदतीमध्ये जे शेतकरी अर्ज सादर करणार नाहीत त्यांचे
अर्ज सिस्टीम आपोआप रद्द करेल. म्हणजेच निवड झाल्यापासून १० दिवसांमध्ये संबंधित शेतकर्‍यांना
महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक  कागदपत्रे अपलोड
करणे बंधनकारक असेल.

त्याचप्रमाणे पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर
बिल सादर करण्याकरिता २५ दिवसांची मुदत दिली जाईल आणि या मुदतीमध्ये बिल सादर न केल्यास
नोंदनिकृत मोबाइल संदेश पाठवून परत  ०५ दिवसांची
वाढीव मुदत देण्यात येईल
आणि या मुदतीमध्ये ही बिल सादर न केल्यास सिस्टीम अर्ज आपोआप
रद्द करेल. म्हणजेच ३० दिवसांमध्ये निवड झालेली बाब/घटक खरेदी करून बिल अपलोड करणे
बंधनकारक असेल.

तर शेतकरी बांधवानो महाडीबीटी पोर्टल वर आपण
अद्याप अर्ज केले नसतील तर आपल्या जवळील सीएससी केंद्र वरती भेट देऊन आपण अर्ज करू
शकता आणि तसेच वरील प्रमाणे महाडीबीटी अपडेट नुसार निवड झाल्यानंतर विहित मुदती मध्ये
प्रक्रिया पार पडावी.

धन्यवाद!

Leave a Comment