कृषि
विभाग द्वारे दिनांक 20 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधी मध्ये जिल्हास्तरीय
कृषि तरंग 2022-23 क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कृषि तरंग
कार्यक्रम हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरातील जिमखाना क्रीडांगण
येथे आयोजन करण्यात आले होते. वनामकृवि चे अधिष्ठाता डॉ. गोखले सर यांच्या हस्ते
कृषि तरंग क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन हे बैलांचे औक्षण, पूजन करून करण्यात आले यावेळी परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी श्री विजय लोखंडे सर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कृषि
तरंग 2023 उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने पथसंचलनाच्या
माध्यमातून विविध दिखावे, जनजागृती संदेश देणारे फलक, विविध घोषणा देऊन उद्घाटन सोहळा पार पडण्यात आला.
परभणी
जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्याने बैल आणि बैलगाडी सजवून त्यासोबत आंतरराष्ट्रीय
पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त रागी, बाजरी, नाचणी यांच्या सेवनाचे महत्व समजून सांगणार्या घोषणा देऊन कार्यक्रमाची
शोभा वाढवली. यावेळी त्यांनी “East or West Millets
are the Best” तसेच “ कॅल्शियम गोळी बंद करा,
नाचणी सेवन सुरू करा” अश्या प्रकारच्या घोषणा देऊन कृषि तरंग महोत्सव मध्ये
पौष्टिक तृणधान्य चे महत्व पटवून दिले.
त्यानंतर, प्रत्येक तालुक्यातील कृषि विभागातील महिला, पुरुष, अधिकारी, कर्मचारी यांनी वैयक्तिक व सांघिक खेळात
सहभाग घेऊन क्रीडा व कला महोत्सव साजरा केला.
कृषि
तरंग 2022-23 : जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धा दरम्यान टिपलेले छायाचित्र :
कृषि तरंग 2023 – परभणी उद्घाटन सोहळा |