मौजे दुसलगाव तालुका गंगाखेड
येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकर्यांची शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले
परभणी: दि 25 ऑगस्ट 2022, वार गुरुवार रोजी गंगाखेड तालुक्यातील दुसलगाव या गावामध्ये स्मार्ट कॉटन
प्रकल्प अंतर्गत शेतकर्यांची शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या वर्गाचे आयोजन हे श्री बनसावडे पी बी, तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
शेतीशाळे साठी गावातील कापूस उत्पादक
शेतकरी उपस्थित होते यावेळी श्री बेले जि एम, कृषि सहाय्यक, ह्यांनी उपस्थित शेतकर्यांना
कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी नियंत्रण साठी कामगंध सापळे यांचा वापर या विषयांवरती
मार्गदर्शन केले. तसेच, जैविक कीड नियंत्रण करण्यासाठी मित्र
कीटक ट्रायकोग्रामा विषयी माहिती दिली आणि शेतात ट्रायकोकार्ड लावण्याचे प्रात्यक्षिक
देखील करून दाखविले.
शेतीशाळा वर्गामध्ये गावातील कापूस
उत्पादक शेतकरी श्री वैजनाथ सोळंके, श्रीहरी लंगोटे, उद्धव लंगोटे, संतोष लंगोटे, साहेबराव सोळंके, बाळासाहेब सुक्रे, भरत लंगोटे, रामदास लंगोटे,आणि
गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.
कृषि विभाग, गंगाखेड
महाडीबीटी अपडेट परभणी महाडीबीटी फक्त परभणी इतर जिल्हे साठी या |