नमस्कार शेतकरी बांधवांनो,
यावर्षी जुन महिन्याच्या सुरूवातीस पावसाअभावी बरेच शेतकरी
बांधवांच्या पेरण्याच्या उशिरा झालेले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या संरक्षित सिंचन
सुविधा असल्यामुळे सोयाबीन पिकाच्या वेळेवर पेरणी झालेली आहे परंतु ज्या शेतकरी
बांधवांची पेरणी उशिरा झालेली आहे अशा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या वाढी संदर्भात
अडचणी येत आहेत. यामध्ये सोयाबीन पिकाची हवी तशी वाढ आपल्याला पहायला मिळत नाहीये.
याचे कारण म्हणजे, जुलै मध्ये सततचा रिमझिम पाऊस आणि
त्यामुळे शेत जमिनीमध्ये वापसा स्थिति चा अभाव हे असू शकते. कारण सोयाबीन पिकामध्ये
पिकाला वाढी साठी आवश्यक अन्नद्रव्य शोषण करण्यास यामुळे अडचण निर्माण होते. जमिनीती
पाणी साचून राहिल्यामुळे पिकांना अन्नद्रव्य शोषून घेण्यास अडचणी येते आणि परिणामी
पिकांची पाने पिवळी पडणे, वाढ न होणे यांसारख्या समस्या निर्माण
होतात.
तर यासाठी आपण खालील प्रमाणे उपाययोजना करू शकता:
विद्राव्य खत 13:40:13 हे 40 ग्राम आणि बोरॉन 10 ग्राम प्रती
10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
किंवा
विद्राव्य खत 12:61:00 हे 40
ग्राम आणि बोरॉन 10 ग्राम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.