हरभरा (Gram) हे पीक
रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. रब्बी हंगामामध्ये सर्वात जास्त पेरा असलेले
पीक म्हणजे हरभरा पिक होय. हरभरा पिकाच्या बागायती आणि जिरायती असे दोन्ही
प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. हरभरा लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन पाण्याचा चांगला निचरा
होणारी कसदार भुसभुशीत जमीन निवडावी लागते. मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात
भरपूर ओलावा टिकून राहतो आणि अशा जमिनीत हरभरा पिके चांगल्या प्रकारे येते.
मध्यम जमिनीत देखील हरभरातील (Gram) चांगल्या प्रकारे येते परंतु त्यासाठी सिंचनाची व्यवस्था असणे आवश्यक
आहे.
हरभरा (Gram) पेरणीपूर्वी
जमिनीची 25 सेंटीमीटर खोल अशी नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवा चा दोन पाळया घालाव्यात.
हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे. जमिनीची कमीत कमी
मशागत करावी त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
हरभरा (Gram) बियाण्याचे
प्रमाण :
लहान दाण्याचा आकार असलेले वाण असतील तर 60 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे बियाणे वापरावे मध्यम आकाराचे वाण असतील तर 75
ते 80 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे बियाणे दर
वापरावा त्यानंतर टपोरे दाणे असलेले वाण असतील तर शंभर किलो प्रती हेक्टर
याप्रमाणे पेरणी करावी.
हरभरा पिकाचे सुधारित वाण, त्यांचा पक्वतेचा कालावधी, उत्पादन, आणि वाणाची वैशिष्ट्ये
हरभरा पिकाचे सर्वात जास्त वापरले जाणारे वाण यामध्ये जॅकी 9218, विजय, दिग्विजय, फुले विक्रम, राजविजय हे आहेत तरी जिरायत आणि बागायत
साठी खालील वाणाची निवड करावी.