पडेगाव येथे रब्बी हंगाम पूर्व तयारी शेतकरी मेळावा संपन्न | Rabi Season Farmers Meeting at Padegaon

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

पडेगाव येथे रब्बी हंगाम पूर्व तयारी शेतकरी मेळावा संपन्न | Rabi Season Farmers Meeting at Padegaon

दि. 30 सप्टेंबर 2022, वार शुक्रवार रोजी गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे जनाई ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड वार्षिक सर्वसाधारण
सभेचे अवचित्य साधून
तालुक्यातील पडेगाव येथे श्री शेषराव निरस यांनी रब्बी हंगाम (Rabi Season) पूर्व
तयारी शेतकरी मेळावा आयोजित केला
होता.


रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मेळावा साठी कृषी विज्ञान केंद्राचे(Krishi Vidnyan Kendra) वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले व कीटक
शास्त्रज्ञ डॉ. अमोल काकडे
हे उपस्थित होते, यांनी उपस्थित
शेतकर्‍यांना
एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management) व रब्बी हंगाम
तयारी याबाबत मार्गदर्शन केले.


तसेच राज्यस्तरीय सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास (Soybean Productivity
and Value Chain Development Scheme) योजना अंतर्गत पीक प्रात्यक्षिक
(Crop Demonstration) प्लॉट वर
प्रक्षेत्र भेट देण्यात आली. यावेळी वनामती जवार
संशोधन केंद्र
(Sorghum Research Institute) प्रमुख डॉ. कांबळे सर व डॉ.जावळे सर यांनीही शेतकर्‍यांना मोलाचे
मार्गदर्शन केले.


तालुका कृषी अधिकारी गंगाखेड श्री. पी.बी. बनसावडे
यांनी
उपस्थित शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी (Farmer Producer Company / FPC) मध्ये
उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी आवाहन केले. यावेळी
मंडळ कृषी
अधिकारी गंगाखेड श्री पी. आर. निरस व कृषी सहाय्यक श्रीमती दुधाळ व आत्माचे एटीएम
श्री सोनटक्के उपस्थित होते
तसेच या
रब्बी शेतकरी मेळाव्याला गावाचे सरपंच श्री नागनाथ नीरस
, ज्ञानोबा नीरस, अच्युतराव
कराळे
, जंनार्धन सूर्यवंशी, पुंडलिक भिसे,गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


#agrinewsparbhai,agir news,krushi salla,krushi_varta,कृषि सल्ला,कृषि वार्ता,कृषि विभाग
परभणी
, तालुका कृषि अधिकारी कार्यालय गंगाखेड

 

Leave a Comment