|
महाडीबीटी – शेतकरी योजना महत्वाची अपडेट | एक शेतकरी एक अर्ज | MAHA DBT Update, mahadbt farmer |
महाडीबीटी – शेतकरी योजना
महत्वाची अपडेट
एक शेतकरी एक अर्ज
“महाडीबीटी – शेतकरी योजना” बद्दल :
शेतकरी बांधवानो, आपणास कृषि
विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी
कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत होतो. आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्याला
एका पेक्षा अधिक घटक/बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा
अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्याला प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि
त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात
जमा करावी लागत होती.
परंतु, शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन
यांनी आता शेतकर्यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्यांना
कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे
जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी
वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे
आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल, यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी
योजना हे पोर्टल तयार केले आहे.
आता ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागातील विविध
योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्र किंवा जवळील
कम्प्युटर सेंटर ला भेट देऊन महाडीबीटी – शेतकरी योजना या पोर्टल/साइट वरती हव्या असलेल्या
बाबी/घटक साठी अर्ज करू शकतात.
Read more