e-peek pahani rabi season : शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करण्याकरिता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा मधून राज्यातील शेतकरी हे आपल्या शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही लाभासाठी यापुढे ई-पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरुन मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे. तद् अनुषंगाने रब्बी हंगाम २०२४ करिता शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी दि. १ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. (e-peek pahani rabi season)
त्याकरिता ई-पीक पाहणी (DCS) V 3.0.3 डाऊनलोड करावे. तसेच डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित Geo Fencing बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तो पर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी upload करता येत नाही. (e-peek pahani rabi season)
तरी सर्व जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी रब्बी हंगाम २०२४ साठी ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही. (e-peek pahani rabi season)
Tags : e peek pahani last date 2024, e peek pahani online, e peek pahani 2024, e peek pahani app download, e peek pahani last date, e peek pahani online registration, e-peek pahani rabi season
* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत
* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती
* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना
* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर