Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत अर्जदारांनी केलेले दावे योग्य आहेत की नाही, हे तपासण्यासाठी राज्यात पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आर्थिक सहाय्य वितरणात अधिक पारदर्शकता येईल, असा सरकारचा विश्वास आहे.

 

त्यामुळे अपात्र अर्जदारांना वगळून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, याची खात्री केली जाईल. योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली, तरी कागदपत्रांची सखोल तपासणी करून अर्ज मंजूर करण्यात यावेत, असे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आला आहे. गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. त्याचबरोबर मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल, असे संकेतही देण्यात आले आहेत.

 

राज्यात तील सुमारे २ कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, सरकारची योजना फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर उलट तपासणी प्रक्रिया सुरू करणार असून योजनेच्या लाभांची योग्यतेनुसार वाटप सुनिश्चित केले जाणार आहे.

 

तसेच या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांची सरकार पडताळणी करणार आहे. बनावट कागदपत्र सादर करुन कोणी लाभ घेतला असेल तर सरकार अशा लोकांकडून वसुलीही करू शकते आणि अशा लोकांना तुरुंगातही पाठवू शकते, असेही सांगण्यात आले आहे.

 

तसेच, राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेचा भत्ता हा १५०० रुपये वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता या योजनेच्या लाभार्थींशी संबंधित मोठा निर्णय घेण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. सरकार या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचतो आहे का, याची खात्री करण्यावर भर देणार आहे. आता सरकार या योजने संदर्भातील निकष अधिक कठोर करणार असल्याचे संकेत आहे, याचा उद्देश योग्य लाभार्थांपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा असा आहे.

 

Tags : Ladki Bahin Yojana, ladki bahin yojana last date, mukhyamantri ladki bahin yojana, mazi ladki bahin yojana, mazi ladki bahin yojana 2024 online apply, 

 

हे पण पहा :

 

* 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू

* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत

* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

Leave a Comment