महाडीबीटी लॉटरी चा मेसेज तर आला आहे परंतु मध्ये कोणत्या घटकासाठी निवड झाली ते कसे पहायचे? mahadbt, maha dbt portal, mahadbt farmer
शेतकरी बांधवानो, महा डीबीटी पोर्टल (mahadbt)द्वारे कृषि विभागातील
विविध योजना जसे की, कृषि यांत्रिकीकरण, सिंचन साधने आणि सुविधा, फलोत्पादन या मुख्य
घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही
ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते.
तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात आसून
निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या
बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड
करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात परंतु ही निवड कोणत्या घटकासाठी, औजारे साठी झालेली आहे ते कसे
पहायचे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.