दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी
महाडीबीटी पोर्टल MAHADBT FARMER द्वारे तुषार
संच, ठिबक संच लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी Lottery List काढण्यात आलेली
आहे. (Mahadbt farmer lottery)
तर महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती निवड संदर्भात संदेश प्राप्त झाला असेल आणि ज्या लाभार्थ्यांना संदेश मिळाला नसेल तर आपण खालील सोडत
यादी डाउनलोड करून यादी मध्ये नाव आहे का ते पाहू शकता.
प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना PMKSY
महाडीबीटी पोर्टल –
आवश्यक कागदपत्रे
महाडीबीटी शेतकरी योजना
पोर्टल वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच
किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर
अपलोड करावयाची कागदपत्रे
खालीलप्रमाणे:
1. सात
बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
2. आठ अ-
होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
3. अर्जदार
अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र
4. सामाईक
क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
5. वैध
जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)
तुषार आणि ठिबक साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची
निवड यादी पाहण्यासाठी आपला जिल्हा निवडा
अधिक वाचा :
* एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान (MIDH) कृषि यंत्रे सोडत यादी 17/11/2022
* पॅक
हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022