कृषि तरंग 2023 – परभणी जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सव संपन्न | Parbhani District Krushi Tarang Sports Event

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कृषि तरंग 2023 - परभणी जिल्हास्तरीय क्रीडा व कला महोत्सव संपन्न | Parbhani District Krushi Tarang Sports Event

कृषि
विभाग द्वारे दिनांक 20 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधी मध्ये जिल्हास्तरीय
कृषि तरंग 2022-23 क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कृषि तरंग
कार्यक्रम हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरातील जिमखाना क्रीडांगण
येथे आयोजन करण्यात आले होते. वनामकृवि चे अधिष्ठाता डॉ. गोखले सर यांच्या हस्ते
कृषि तरंग क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन हे बैलांचे औक्षण
, पूजन करून करण्यात आले यावेळी परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी श्री विजय लोखंडे सर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

कृषि
तरंग 2023 उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने पथसंचलनाच्या
माध्यमातून विविध दिखावे
, जनजागृती संदेश देणारे फलक, विविध घोषणा देऊन उद्घाटन सोहळा पार पडण्यात आला.

 

परभणी
जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्याने बैल आणि बैलगाडी सजवून त्यासोबत आंतरराष्ट्रीय
पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त रागी
, बाजरी, नाचणी यांच्या सेवनाचे महत्व समजून सांगणार्‍या घोषणा देऊन कार्यक्रमाची
शोभा वाढवली. यावेळी त्यांनी “
East or West Millets
are the Best” तसेच “ कॅल्शियम गोळी बंद करा,
नाचणी सेवन सुरू करा” अश्या प्रकारच्या घोषणा देऊन कृषि तरंग महोत्सव मध्ये
पौष्टिक तृणधान्य चे महत्व पटवून दिले.

 

त्यानंतर, प्रत्येक तालुक्यातील कृषि विभागातील महिला, पुरुष, अधिकारी, कर्मचारी यांनी वैयक्तिक व सांघिक खेळात
सहभाग घेऊन क्रीडा व कला महोत्सव साजरा केला.

 

कृषि
तरंग 2022-23 : जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धा दरम्यान टिपलेले छायाचित्र :


कृषि तरंग 2023 – परभणी उद्घाटन सोहळा


कृषि तरंग 2023 – परभणी उद्घाटन सोहळा

पथसंचलन, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, परभणी


पथसंचलन, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगाखेड


कबड्डी संघ, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगाखेड


कबड्डी संघ, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, परभणी



खो खो संघ, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, परभणी

वॉलीबॉल विजयी संघ, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, परभणी 


खो खो विजयी संघ, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगाखेड

तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगाखेड



महिला खो खो संघ, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, परभणी

महिला क्रिकेट संघ, स्थानिक SAO/DSAO/ATMA, परभणी

राऊडि बॉइज, गंगाखेड

राऊडि बॉइज, गंगाखेड

तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सेलू

कबड्डी विजयी संघ, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, परभणी

खो खो अंतिम सामना : गंगाखेड वि. परभणी


Volleyball Parbhani Districts #1 Player



तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड


क्रिकेट संघ, स्थानिक परभणी SAO/DSAO/ATMA




Leave a Comment